- आपल्या भारदस्त आवाजात शिवरायांचा इतिहास जागा करणारे आणि आबालवृद्धांवर आपल्या ओजस्वी वाणीची मोहिनी घातलेले युवा शिवकथाकार प्रा. सुमंत टेकाडे यांचे निधन
प्रा. टेकाडे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे १२ एप्रिल रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, शनिवारी पहाटे त्यांचे उपचारांदरम्यान निधन झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. एमबीए केल्यानंतर ते बेंगळुरू येथे विप्रो कंपनीत नोकरीला होते. तेथील नोकरी सोडून त्यांनी दोन ते तीन वर्षे अमरावती येथे संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. त्यानंतर, नागपुरातील एस.बी. जैन कॉलेज येथे मॅनेजमेंट विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
पीएच.डी. केल्यानंतर गेली काही वर्षे त्यांनी शिवकथेचा प्रचार आणि प्रसारकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. तरुणांसह मोठ्यांमध्ये लोकप्रिय असलेले शिवकथाकार म्हणून त्यांनी अल्पावधीतच लौकिक मिळवला होता. विदर्भ, महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या शिवकथेवरील व्याख्यानांना जोरदार प्रतिसाद मिळत असे. शिवकथेव्यतिरिक्त ते व्यक्तिमत्त्व विकास, पालकत्व, मोटिव्हेशन इत्यादी विषयांवरदेखील व्याख्याने देत. मार्गदर्शन करीत असत.
प्रा. सुमंत टेकाडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये २०१८-१९ मध्ये स्तंभलेखनदेखील केले होते. 'कोरीव... ठा 'शिव'' शीर्षकाच्या या सदरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे आजच्या संदर्भातील महत्त्व विशद केले होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.