- लॉकडाऊन होणार की, कडक निर्बंध लागणार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
शनिवारी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांसह विविध क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉकडाऊन लावायचा की, कडक निर्बंध लावायचे याविषयी चर्चा आजच्या बैठकीमध्ये केली जाईल आणि यानंतर मोठा निर्णय दिला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ऑनलाइन पध्दतीने ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असूनही बाजारातील नागरिकांची गर्दी कमी झालेली नाही. यामुळे रुग्णसंख्येत सातत्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात शनिवारी 49,447 नवीन रुग्ण आढळले. 37,821 रुग्ण बरे झाले आहेत आणि 277 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 29.53 लाख लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 24.95 लाख लोक बरे झाले आहेत. तर 55,656 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सध्या जवळपास 4.01 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.