- रजा मुराद सोबत सेल्फी काढण्याच्या नाद लोकांना आवळता आला नाही
दि. ३ एप्रिल रोजी कोविड १९ च्या प्रशासकीय निर्देशांचे पालन करीत स्थानिक श्री मंगल कार्यालयात ह्युमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित अपनापन स्व. सुल्ताना बेगम निराधार केंद्राचे उदघाटन व सत्कार कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ अभिनेते रजा मुराद बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, ह्यु.वे.म.असो. च्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण, नागपूरचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, कृ.उ.बा. समितीचे सभापती वासुदेव ठाकरे, इंटक युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती ह्यु.वे.म.असोचे उपाध्यक्ष फय्याज शेख व राकॉचे तालुकाध्यक्ष सरपंच सुधाकर रोहणकर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फतीमा शेख आणि ह्यु. वे.म. असो. च्या जेष्ठ कार्यकर्त्या बुध्दवासी शालुताई दुपारे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर जेष्ठ चित्रपट अभिनेते रजा मुराद यांच्या शुभहस्ते फीत कापून अपनापन स्व. सुलताना बेगम निराधार केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी अभिनेते रजा मुराद यांच्या शुभ हस्ते समाजातील विविध क्षेत्रात सतत अग्रेसर असणाऱ्या महिलांचा शाल, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राकॉचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, मुस्ताक पठाण आणि इंटक युवाकॉचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती यांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह्यु.वे.म. असोच्या शाहिस्सा पठाण, सुत्रसंचलन नौशाद सिद्दीकी व आभार प्रदर्शन कौसर खान यांनी केले.
रजा मुराद सोबत सेल्फी काढण्याच्या नाद लोकांना आवळता आला नाही
चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती आपल्या शहरात असल्याचे कळताच अभिनेते रजा मुराद यांच्या सोबत सेल्फी काढण्याच्या नाद लोकांना आवळता आला नाही. विविध लोकांनी त्यांच्या सोबत सेल्फी मिळावी या नादात तोबा गर्दी केली होती. रजा मुराद यांनी सुद्धा चाहत्यांना नाराज न करता प्रेक्षकांच्या सेल्फी ला योग्य प्रतिसाद दिला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.