Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डॉक्टरसह दोघांना मारहाण ; हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून काउंटरला लावली आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
करोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी घातला गोंधळ आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - करोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नाते...

  • करोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी घातला गोंधळ

आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
करोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी गोंधळ घालत कामठी मार्गावरील होप हॉस्पिटलच्या डॉक्टरसह दोघांना मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून काउंटरला आग लावली. शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने हॉस्पिटलमधील अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पिवळी नदी परिसरात राहणाऱ्या सुनीता पाली यांची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी त्यांना होप हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चाचणीदरम्यान पाली या करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. करोनाबाधित असल्याने नियमानुसार डॉक्टर बी. के. मुरली यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती दिली. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण व्हायला विलंब होत असल्याने पाली यांचे नातेवाईक संतापले. मृतदेह ताब्यात देण्याची मागणी नातेवाइकांनी डॉ. मुरली यांना केली. प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यात येणार नाही, असे मुरली यांनी नातेवाइकांना सांगितले. पाली यांचे नातेवाइक संतापले. त्यांनी डॉ. मुरली यांना धक्काबुक्की सुरू केली. अन्य एक कर्मचारी मदतीसाठी धावला. त्यालाही पाली यांच्या नातेवाइकांनी मारहाण केली. हॉस्पिटलमध्ये तोडफोड करून काउंटरला आग लावली. घटनेची माहिती मिळताच पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी ओमप्रकाश शाहूसह नऊजणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी मारहाण, जाळपोळीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top