Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: हवे मूठभर धान्य आणि वाटीभर पाणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
JCI राजुरा प्राईड द्वारे पक्ष्यांकरिता दाना पाण्याची व्यवस्था अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - उन्हाच्या झळा भाजून काढत ...

  • JCI राजुरा प्राईड द्वारे पक्ष्यांकरिता दाना पाण्याची व्यवस्था

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
उन्हाच्या झळा भाजून काढत आहेत. उन्हापासून दक्षतेचे सर्व उपाय करुनही एखादी फेरी मारल्यानंतर धडधाकट माणसाला कधी एकदा घराच्या गारव्यात जातो अशी तीव्र इच्छा होते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे मूठभर धान्याची व वाटीभर पाण्याची. उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठीच JCI राजुरा प्राईड द्वारे टीचर्स कॉलनी येथे पक्ष्यांकरिता दाना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी जेसीआय राजुरा प्राईड चे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान, सचिव जेसी जहीर लखानी, जेसीआय राजुरा प्राईड चे माजी अध्यक्ष जेसी व्यंकटेश गड्डम, शारदा गड्डम, कैलास उराडे सर प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी "आमचा विदर्भ" शी बोलतांना प्राईड चे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी सांगितले कि, उन्हाळ्याने लाहीलाही होत असताना पाण्याच्या, अन्नाच्या शोधासाठी पक्ष्यांची होणारी परवड मृगाच्या पहिल्या सरीपर्यंत सुरू राहणार आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकांनी दररोज मूठभर धान्य व वाटीभर पाणी अंगणात ठेवले तर उन्हाळा सुसह्य ठरणारच आहेच. त्यासाठी धान्य, पाणी, घरटं देणाऱ्या हातांनी सरसावण्याची गरज आहे. 



Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top