Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मनसे तर्फे भव्य रबरी बॉल खुल्या सामन्याचे उद्घाटन व पक्ष प्रवेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील नाईकनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रबरी बॉल खुल्या सामन्या...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील नाईकनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे रबरी बॉल खुल्या सामन्याचे उदघाटन आज करण्यात आले. सामन्यात प्रथम व द्वितीय पुरस्कार ठेवण्यात आले असून प्रथम पुरस्कार ३१,००० महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे तर द्वितीय पुरस्कार २१,००० बंजारा टायगर मंडळ  नाईकनगर तर्फे देण्यात येणार आहे. खेळ सामन्याचा आयोजना निमित्य विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. 

सामन्याचे व पक्ष प्रवेशाचे आयोजन सुरज भामरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड, मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, चंद्रपूर विधानसभा संघटक महेश शास्त्रकार, तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, जिवन गेडाम आणि स्थानिक पदाधिकारी व मनसे सैनिक उपस्थित होते. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top