Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुकानाच्या वेळा सकाळी 7 ते रात्री 8
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाख...

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल दिले आहेत.

नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहतील तसेच त्यांना रात्री 11 पर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल.

शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मीक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावी. अभ्यागतांकरिता ऑनलाईन आरक्षणासारख्या सोयीची सुरवात करावी. तसेच या ठिकाणी प्रवेशाकरिता मास्कचा वापर बंधनकारक राहील. तसेच प्रवेशस्थळी तापमान मोजण्याचे साधन, परिसरातील प्रत्येक ठिकाणी हात धुण्याकरिता साबन अथवा सॅनिटायजर्स ठेवावी.

यापुर्वीच्या नियमांसोबतच वरील निर्देशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top