Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथील बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यीकरण करणार- नगराध्यक्ष अरूण धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा शहरात सर्व महापुरुषांचे चौक असून नगरपरिषदेने सर्व चौकाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले आ...


आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा शहरात सर्व महापुरुषांचे चौक असून नगरपरिषदेने सर्व चौकाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.  मात्र शहरात आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान असणारे भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या चौकाचे सौंदर्यीकरण बाकी असल्याचे दिसत आहे. 

यामुळे प्राधान्याने हे काम करण्याचे आश्वासन राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. नगर परिषद राजुरा येथे नुकताच आदिवासी कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली त्या बैठकीत ते बोलत होते. 

राजुरा शहरात आदिवासींचे प्रेरणा स्थान असणारे क्रांतिकारक महापुरुषांच्या चौका कडे नगर परिषद दुर्लक्ष करणार नाही तसेच चौकाच्या सौंदर्यीकरनासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच उत्कृष्ट आर्किटेक्ट नेमू असेही त्यांनी झालेल्या बैठकीत बोलून दाखविले. यामुळे आदिवासी बांधवांच्या भावनांची कदर करणारे अध्यक्ष नगरपरिषदेला लाभले असे मत आदिवासी बांधव व्यक्त केले आहे. 

झालेल्या बैठकीत आदिवासी कार्यकर्ते, उपाध्यक्ष अनिल देशपांडे नगरसेवक आनंद,  दासारी, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top