Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
५ कोटी ११ लाखाच्या विकास कामांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा शहर नगरा...

  • ५ कोटी ११ लाखाच्या विकास कामांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते उद्घाटन

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा शहर नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात विकासाचे नवे क्षितिज गाठित असून या आधी आपण मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या वर्षी ५ कोटी ११ लाखाच्या निधीतून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. राजुरा शहर विकासासाठी आपले पुर्ण सहकार्य असून निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. 

यात नागरी दलीत वस्ती सुधारणा योजना अंतर्गत अं.क्र.१ ते ६ कामे अंदाजित खर्च ८५ लाख ८ हजार रुपये निधी, १४ वा वित्त आयोग अंतर्गत माजी मालगुजारी तलाव विकास व इतर कामे करणे १ कोटी १७ लाख ७३ हजार रुपये निधी, विशेष वैशिष्ट्यपुर्ण योजना अंतर्गत न.प. हद्दीत अ.क्र. १ ते १८ कामे करणे ३ कोटी २७ लाख ६६ हजार रुपये निधी, चुनाळा टि पाईट जवळ सौंदर्यींकरण करणे १८ लाख ७१ हजार रुपये निधी अशी एकूण ५ कोटी ११ लाखाची विकास कामे शहरात होणार आहेत.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, आरोग्य सभापती आनंद दासरी, सभापती राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहने, संध्या चांदेकर, साधना भाके, अभियंता रवी जामुनकर, कंत्राटदार उपेंद्र गुप्ता यासह सर्व नगरसेवक, न प कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले, संचालन विजय जांभुळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top