Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात राजुरा काँग्रेसचे उपोषण अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - केंद्रातील भारतीय जनत...

  • केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात राजुरा काँग्रेसचे उपोषण

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे देशभरातील शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त होणार आहे. आपल्या निवडक व्यापारी मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी हे सरकार शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळत आहे. या तिन्ही काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सीमेवर मागील १०० दिवसांपेक्षा जास्त काळ ठान मांडून बसले आहेत. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने एका मागून एक सरकारी संस्थांचे खासगीकरण करीत असून कामगार कायद्यांतील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत, या सरकारला सर्व सामान्य माणसाच्या जीवनमरणाचे काहीही देणेघेणे नाही म्हणूनच कोरोना सारख्या महामारी च्या तडाख्यात आर्थिक खाईत सापडलेल्या नागरिकांना इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रचंड वाढ करून त्यांचे कंबरडे मोडले जात आहे. या षडयंत्रकारी केंद्र सरकार आणि भाजपामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या या सर्व अन्यायकारक कायदे आणि धोरणांविरोधात हे उपोषण आंदोलन आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन करताना दिली. या प्रसंगी अनेकांनी आपल्या मार्गदर्शनातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. 

आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत उपोषण व धरणे आंदोलण करण्यात आले. यानिमित्ताने महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोवीद यांना तहसीलदार यांच्या मार्फत तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, उपसभापती मंगेश गुरुनुले, प.स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, कुंदाताई जेणेकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, न प सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दिपा करमनकर, संध्या चांदेकर, गीता रोहने, साधना भाके, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, मोहसीन अली बंदाली, जश्विंदरसिंग धोत्रा, युवक शहर अध्यक्ष अशोक राव, सर्वानंद वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद, शहराध्यक्ष रफिक शेख, रामभाऊ ढुमने, अॅड. रामभाऊ देवईकर, उमेश मिलमिले, कवडू सातपुते, शिवराम लांडे, लहू चहारे, पंढरी चंन्ने, विनोद दरेकार, वसंता ताजने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, साबीर सय्यद, संतोष इंदुरवार, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम पुष्पवर्षा जुलमे, शारदा मोहितकर, आरपीआयचे पुष्पा मोरे, कविता मोरे, लता डकरे, सुप्रिया गेडाम, सुजित कावळे, संदीप पोगला, एकनाथ कौरासे, राहुल वनकर, सचिन मोरे यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस,  महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय, राष्ट्रवादी काँग्रेस, इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि  नागरिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top