- 'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना' गुलजार यांच्या ओळीचा श्रोत्यांना आला प्रत्यक्ष प्रत्यय
- नेफडो व स्वरप्रीती कला अकादमी तर्फे सर्वधर्मसमभाव प्रार्थना - पठण चे आयोजन
संपूर्ण मानवजातीला कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. सर्वस्तरातून अनेक उपाययोजना, सोई, सुविधा, प्रशासनिक व्यवस्था असतानांही कोरोनाने आपली व्याप्ती वाढवलेली आहे. संपूर्ण विश्व कोरोनामुक्त व्हावे याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थना सभेची सुरवात "इतनी शक्ती देना दाता" या सुमधुर गीताने स्वरप्रितिच्या संयोजिका आणि नेफडोच्या तालुका अध्यक्षा अलका सदावर्ते यांनी केली.
गुरवंदना - अनुष्का रैच, गणेश वंदना - मीरा कुलकर्णी, हनुमान चालीसा - स्वरूपा झंवर, बुद्ध वंदना - करुणा जांभुळकर, नमाज - नशिरा शेख, शबाना शेख, पंजाबी गुरुबानी - हर्षिका हरभजन सिंग, इसाई प्रार्थना - अल्का सदावर्ते यांनी सादर केली. देशात बंधूभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे या राष्ट्रसंताच्या भजनाने सारे वातावरण भावविभोर झाले, सुनैना तांबेकर, वर्षा वैद्य, भावे, विना देशकर, राजश्री उपगन्लावार, मेघा धोटे यांनी राष्ट्रवंदना सादर केली. तबला साथ-संगत नक्कावार तर हार्मोनियम वर मोहनदास मेश्राम यांनी साथ दिली.
याप्रसंगी नेफडोचे जिल्हा संघटक विजय जांभुळकर, नेफडो च्या नागपूर विभाग उपाध्यक्ष नागोसे, खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नेफडोच्या तालुका सचिव मेघा धोटे, प्रास्ताविक दिलीप सदावर्ते, आभार विभागीय सचिव बादल बेले यांनी केले. दोन्ही संस्थेच्या वतीने रोपटे देऊन हिंदू, मुस्लिम,शीख, इसाई यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रजनी शर्मा, मनोज तेलीवार, संतोष देरकर, उमेश लढी, संदीप आदे, सुनैना तांबेकर यांनी परिश्रम घेतले. सामजीक बांधिलकी जपणाऱ्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.