Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महिलांनी राजकारणात येणे काळाची गरज - सतलूबाई जुमनाके
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चाची शाखा स्थापना शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - ...

  • कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला मोर्चाची शाखा स्थापना

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
महिलांनी राजकारणात येऊन समाजाच नेतृत्व कराव, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा परिषेदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके यांनी केले. त्या कोरपना तालुक्यातील मौजा खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला मोर्चा शाखा स्थापन कार्यक्रमात बोलत होत्या. 

या वेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन जुमनाके, जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, अल्पसंख्यांक सेल प्रदेशाध्यक्ष अब्दुल जमीर, जेष्ठ नेते ममताजी जाधव, बाजार समिती संचालक निशिकांत सोनकांबळे, प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मुनीर सय्यद, राजुरा विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष फारुख शेख, कोरपना तालुक्यातील युवा नेते संजय सोयाम, मेजर बंडूजी कुमरे, लक्ष्मण कुळसंगे, नानाजी मडावी, प्रकाश शेडमाके उपस्थित होते. 

खडकी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या शाखा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यात दीपाताई मडावी अध्यक्ष, सीताताई मेश्राम उपाध्यक्ष, सोनू गेडाम सचिव, सीताबाई मेश्राम, सुवर्णा मडावी, लक्ष्मीबाई परचाके, वाघूबाई कोरांगे, सुमन मेश्राम, दुर्गाबाई तुमराम, सुनीता गेडाम, गिरजा गेडाम, संजीवनी गेडाम, रंजू मेश्राम, अर्चना पेंदोर, मोतूबाई कुमरे, संगीता येडमे, नंदा आत्राम, मनीषा कुमरे, संगीता कोरांगे, शालूबाई वेरकाडे, निर्मला उरवेते, लक्ष्मीबाई गेडाम, मंजुषा मरस्कोल्हे, ज्योस्त्ना कोटनाके, अल्काबाई सिडाम, ताराबाई कोडापे, मालनबाई आडे, इंदू उरवेते, उज्वला परचाके यांची निवड करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top