Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खैरगुडयातील तरुणांचा अनोखा उपक्रम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना रात्र पाळीत शिकवण उजळणी अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन - ...

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना रात्र पाळीत शिकवण उजळणी

अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
राजुरा तालुक्यात आदर्श व हागणदारी मुक्त गाव म्हणुन नावारूपास येत असलेल्या खैरगुडा या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन मागील अनेक दिवसापासुन विद्यार्थ्यांना रात्र पाळीत शिकवण उजळणी सुरु आहे. या शिकवण उजळणीला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना मुळे मागील एक वर्षांपासून पहिली ते चौथी वर्गापर्यँतच्या शाळा पूर्णतः बंद आहेत. मुलांच्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत गावातील तरुणांनी वाचनालयाचाच्या माध्यमातुन रात्र पाळीत शिकवण उजळणी सुरु केली आहे. या रात्र पाळीतील शिकवण उजळणी वर्गाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top