Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सोनोग्राफी केंद्रांची नियमीत तपासणी करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गर्भलिंगनिदान दक्षता पथकाच्या सभेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - गर्भपात व सोनोग्राफी कें...

  • गर्भलिंगनिदान दक्षता पथकाच्या सभेत जिल्हाधिकारी गुल्हाने यांचे निर्देश
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
गर्भपात व सोनोग्राफी केंद्रावर अवैधिरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे कायद्याने गुन्हा असून जिल्ह्यात असे प्रकार होऊ नये म्हणून नियमितपणे सोनोग्राफी केद्रांची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले.

गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत दक्षत पथकाची सभा जिल्हाधिकारी गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, ॲड. विजया बांगडे, प्रमोद उंदीरवाडे व संबंधीत तालुक्यातील वैद्यकीय अधिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व निदान तंत्र अधिनियम अंतर्गत आतापर्यंत तालुकानिहाय काय कारवाई करण्यात आली, पेशन्टचे रजिस्ट्रेशन होते काय, ऑनलाईन माहिती न भरणाऱ्यावर काय कारवाई करणार इ. बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिक्षक बी.एस. धुर्वे, डॉ. पी.वाय. खंडाळे, गो.वा.भगत, डॉ. मनिष सिंग, डॉ. रोहन झाडे, डॉ. अर्पिता वारकर, डॉ. नयना उत्तरवार, कांचन वरठी, तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top