Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निमगडे हत्याकांड: रणजित सफेलकरने घेतली होती पाच कोटींची सुपारी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - हायलाइट्स: उपराजधानीतील वास्तुविशारद एकनाथ निमगडे (वय ७२) यांची हत्या करण्यासाठी कामठीतील कुख...

आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
हायलाइट्स:
  • उपराजधानीतील वास्तुविशारद एकनाथ निमगडे (वय ७२) यांची हत्या करण्यासाठी कामठीतील कुख्यात रणजित सफेलकर याने पाच कोटी रुपयांची सुपारी घेतली होती.
  • रणजित याच्या इशाऱ्यावरूनच निमगडे यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे पत्रकार परिषदेत दिली.
  • सीबीआयकडे असलेल्या या हत्याकांडाचा तपासाचा नागपूर पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर पर्दाफाश केला.
कामठीतील कुख्यात रणजित सफेलकर याने पाच कोटी रुपयांची सुपारी घेतली होती. रणजित याच्या इशाऱ्यावरूनच निमगडे यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी सिव्हिल लाइन्समधील पोलिस जिमखाना येथे पत्रकार परिषदेत दिली. सीबीआयकडे असलेल्या या हत्याकांडाचा तपासाचा नागपूर पोलिसांनी तब्बल पाच वर्षांनंतर पर्दाफाश केला. 

६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ८ वाजताच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात बेछूट गोळीबार करून एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. पाच वर्षांपासून सीबीआय या हत्याकांडाचा तपास करीत होते. सीबीआयने मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. मात्र मारेकऱ्यांबाबत सीबीआयला माहिती मिळाली नाही.

दरम्यान, हिंगण्यातील दरोडा प्रकरणात पोलिसांनी रणजित व कालू हाटे याचा साथीदार कुख्यात राजा ऊर्फ पीओपी याला अटक केली. राजाचा या हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती अमितेशकुमार यांना मिळाली. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांना राजाची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले. गुन्हेशाखा पोलिसांनी राजाची कसून चौकशी केली असता रणजित सफेलकर याने कालू हाटे याच्या माध्यमातून जुलै २०१६ मध्ये कुख्यात नवाब ऊर्फ नब्बू अशरफी याला निमगडे यांच्या हत्येची सुपारी दिली.

सुरुवातीला सफेलकर याने नब्बू याला २० लाख रुपये दिले. नब्बू याने राजा पीओपी, शहबाज, अलताफ, मुश्ताक अशरफी, परवेज, अशरफ, अफसर, बाबा व अन्य साथीदारांची जुळवाजुळव केली. नब्बू याला निमगडे यांच्या हत्येची संधी मिळाली नाही. सप्टेंबर महिन्यात रणजित याने नब्बू व त्याच्या साथीदारांना पुन्हा एक कोटी २० लाख रुपये दिले. यावेळी कालू याने नब्बू याला मारहाणही केली.

६ सप्टेंबर २०१६ ला राजा पीओपी, परवेज ,नब्बू व त्याच्या साथीदारांनी निमगडे यांची हत्या करण्यासाठी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर पाळत ठेवली. लाल इमली चौकात राजाने निमगडे यांना गाठले. यावेळी परवेजही त्याच्यासोबत होता. परवेज याने देशीकट्ट्यातून बेछूट गोळीकार करून निमगडे यांची हत्या केली व फरार झाले. रणजित सफेलकर, कालू, परवेज, नब्बू व त्याचे साथीदार भूमिगत झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

या चौकशीचा अहवाल व मारेकऱ्यांबाबत सीबीआयला माहिती देण्यात आल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top