Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब! 'चुकून' वाटले पाच कोटी रुपये
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात ४ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपये अपात्र शेतकऱ्...


आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यात ४ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपये अपात्र शेतकऱ्यांना वाटण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांची संख्या ६ हजार २६८ इतकी आहे. हा निधी चुकून वाटण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने यांदर्भातील माहितीत म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना तसेच दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारच्या वतीने दिली जाते. दोन हजार रुपये प्रती हप्त्याने हा निधी वितरित करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या काळातील या निधीची आकडेवारी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील २ लाख १० हजार ८३ पात्र शेतकऱ्यांना सन्मान निधीचे वाटप करण्यात आले आहे.

मात्र, या निधीचे वाटप करताना अपात्र शेतकऱ्यांनाही रक्कम देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार, ४ कोटी ८७ लाख ८४ हजार रुपये अपात्र शेतकऱ्यांना 'चुकून' वाटण्यात आले आहेत. चुकीने असा निधी मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील संख्या ६ हजार २६८ इतकी आहे. याशिवाय, नागपूर जिल्ह्यातील प्राप्तीकर भरणारे आणि योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७१२ असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या अपात्र शेतकऱ्यांना वाटलेली रक्कम परत घेण्यासाठी तालुकास्तरावर वसुली करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top