Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भारोसा येथे राष्ट्रीय शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे थाटात अनावरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भारोसा गावात गोंडीयण संस्कृती संवर्धन समित...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भारोसा गावात गोंडीयण संस्कृती संवर्धन समिती च्या वतीने १८५७ चे राष्ट्रीय शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ मार्च २०२१ ला मान्यवरांच्या उपस्थितीत शेडमाके यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण थाटात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या नियोजनानुसार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वीर बाबुराव शेडमाके यांच्या भव्य मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सल्ला-गांगरा शक्तीस्थळावर भुमक गजानन कुळमेथे,दिगांबर मराठे यांच्या हस्ते मुठपूजा व गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर मिरवणूकचे राष्ट्रीय शहिद वीर बाबुराव शेडमाके चौक येथे विसर्जन करुन सभेत रुपांतर करण्यात आले. भव्य सभेला तसेच पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नियोजित मान्यवर म्हणून अध्यक्षस्थानी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी राजुरा, उद्घाटक म्हणून विजयराव परचाके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राजुरा तसेच विशेष अतिथी म्हणून जिवती नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष गजानन गोदरू पाटील जुमनाके, माजी सभापती मडावी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगेश कोडापे स.शि.राजुरा, संजू पाटिल सोयाम माथा, भगवान परचाके इरई, लक्ष्मन कुरसंगे मांडवा, संदिप पंधरे आवाळपूर, चंदाताई गेडाम एकोडी, भारोसा ग्रामपंचायत चे सरपंच देवराव निमकर, पोलीस पाटील सतिष गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव पावडे ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई परचाके, शितल ढवस, कल्पना आगलावे आदि मान्यवर उपस्थितीत वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पुष्पमाला व दिप प्रज्वलीत करून  करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित सभेला बाबुराव शेडमाके यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

प्रास्ताविक गोंडीयन संस्कृती संवर्धन समिती चे सचिव संजय तोडासे यांनी केले तर कार्यक्रमांचे बहारदार संचालन तिरूमाय मनिषा समिर गेडाम व आभार निलेश गेडाम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष वामन पाटील तोडासे, उपाध्यक्ष रामदास तोडासे, सचिव सुनील तोडासे, सहसचिव समिर गेडाम, कोषाध्यक्ष अशोक तोडासे, कार्याध्यक्ष सचिन किन्नाके, सदस्य प्रशांत तोडासे, रामचंद्र तोडासे, मनोज तोडासे, सुरेश कन्नाके, विलास कन्नाके, गणबा तोडासे, मारोती तोडासे, अक्षय गेडाम, अनिल गेडाम, मनोहर गेडाम, विजय गेडाम, सुनील गेडाम, रवि गेडाम, सुभाष मेश्राम, गोलू तोडासे, रमेश तोडासे, रत्न तोडासे, मयुर तोडासे, नत्थु तोडासे, भिकाजी तोडासे, चेतन तोडासे, कालीदास तोडासे व गावकरी मंडळी भारोसा यांनी अथक परिश्रम घेतले. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top