- राज्यात 14 मार्च रोजी होणार असलेली MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
- वाढत्या कोरानाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती जारी केली
औरंगाबाद -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.
आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद शहरातील 59 केंद्रावर 19 हजार 656 उमेदवारांनी नोंदणी केली होती. विदर्भातील किती उमेदवारांनी नोंदणी केली होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही. यापूर्वी देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेतील करिअर करु पाहणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी वाट पहावी लागणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.