- ऑर्डर कँसल केल्यामुळे झोमॅटो डिलीव्हरी बॉयने फोडले महिलेचे नाक
- पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
- कंपनीने दिले कारवाईचे आश्वासन
बंगळुरु -
बंगळुरुत ऑर्डर कँसल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने महिलेचे बुक्की मारुन नाकाचे हाड तोडल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. त्या डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर इतक्या जोराने बुक्की मारली की, त्या महिलेच्या नाकाचे हाड तुटले आणि रस्क्तस्राव सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओदेखील त्या महिलेने शेअर केला आहे.
https://www.instagram.com/tv/CMOJo0XnfET/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/tv/CMOJo0XnfET/?utm_source=ig_embed
एक तास उशीराने पोहचला डिलीव्हरी बॉय
या घटनेबाबत जखमी महिला हितेशा हिने सांगितले की, तिने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता झोमॅटोवरुन ऑर्डर दिली होती. पण, डिलीव्हरी बॉय साडेचार वाजेपर्यंत न आल्यामुळे तिने ऑर्डर कँसल केली. काही वेळानंतर डिलीव्हरी बॉय आला, पण महिलेने ऑर्डर घेण्यास नकार दिला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान आरोपीने महिलेच्या नाकावर जोराने बुक्की मारुन तेथून पळ काढला.
कंपनीने दिले कारवाईचे आश्वासन
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीने सोशल मीडियाद्वारे या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. कंपनीने म्हटले की, हा खूप खराब अनुभव होता. आमचा स्थानिक प्रतिनिधी लवकरच तुमच्या मदतीला येईल. या प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करणार.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.