बल्लारपूर -
जिल्ह्यात अवैध रेती तस्करी व वाहतूक खुलेआम सुरु आहे. यावर महसूल विभाग कार्यवाही करत असले तरी अवैध रेती तस्करी पूर्णपणे थांबत नाही. या तस्करीला आळा बसावा याकरिता बामणी टी पॉइंटवर तहसीलदार व त्यांच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जप्तीची कार्यवाही केली. दुसरी कार्यवाही पळसगाव येथे केली. दोन्ही ट्रॅक्टर मालकांकडून प्रत्येकी १ लाख १० हजार दंड आकारण्यात आला. एकूण २ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तहसीलदार व त्यांच्या पथकाद्वारे केलेल्या धडक कार्यवाही मुळे अवैध रेती वाहतुकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.