- कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार
- मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता
- कृषी व ग्रामीण उत्पादनाचे रेडिमेट पॅकिंगला बाजारात मागणी
प्रधान सचिव अनुप कुमार यांनी काल चंद्रपूर येथील कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बारहते, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजपुत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अे.एन. सोमनाथे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री. जांभुळे, प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रधान सचिव अनुप कुमार यांनी कमी खर्चात व कमी वेळेत जास्त लाभ देणारी शेवगा, मका इ. पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याबाबत, किसान क्रेडिट कार्ड वितरणात प्रगती करण्याबाबत तसेच जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला फार मोठा वाव असून मत्स्यउत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.