Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणी करिता दोन आमदार एकत्र आले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात किशोर जोरगेवार व राजूरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आले एकत्र शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्...

  • स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात किशोर जोरगेवार व राजूरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे आले एकत्र
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
स्थानिकांना रोजगार द्या या प्रमूख मागणी करिता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार व राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी एकत्रित येत महालक्ष्मी कंपणीवर धडक दिली. यावेळी येथे काम करत असलेला कामगार भुमीपूत्र आहे का याचीही शहानिशा करण्यात आली. तसेच या उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधाण्य देन्युअत यावे, कामगारांचे पोलिस वेरीफिकेशन करण्यात यावे, देण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी पैनगंगा उपक्षेत्रीय महाप्रबंधक सुभा रेड्डी, गडचांदुरचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती, कोरपनाचे तहसीलदार हरीश सोमलवार, राजूरा नगराध्यक्ष अरुण धोटे, गाडेगाव विरूरच्या सरपंच गीता राजूरकर, दाताळा सरपंच रविंद्र लोनगाडगे, गाडेगाव उपसरपंच शामला खामनकर, वामन पाटील राजूरकर, अशोक राव, शैलेश लोंखडे, आशिष देरकर, राहूल उमरे, अभय मुनोद, उमेश राजूरकर, सुरेश मालेकर, कलाकार मल्लारप, प्रेम गंगाधरे, विलास सोमलवार, प्रतिक शिवणकर, विलास वनकर, राशीद हुसैन, सलिम शेख, रुपेश झाडे, बाळकृष्ण जुवार, हेरमन जोसेफ, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, आकाश बोनगीरवार, आनंद रणशूर, राजेश वर्मा, पुण्यावर्धन मेश्राम, पंकज चिमुरकर, राजेश वर्मा, आनंद इंगळे आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूरात सर्वत्र वेकोलीच्या कोळसा खाणी आहेत या खाणींमध्ये अनेक खाजगी कंपण्या कार्यरत आहे. या कंपण्यांच्या माध्यमामून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती केल्या जात आहे. असे असले तरी सदर कंपण्यामध्ये रोजगारात परप्रांतीयांना प्राधाण्य दिल्या जात आहे. परिणामी चंद्रपूरातील भुमीपूत्र हक्काच्या रोजगारापासून वंचित आहे. या विरोधात आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्र व राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार एकत्रीत आले असून आज शनिवारी त्यांच्या वतीने वणी वेकोली एरिया येथील पैनगंगा व मुंगोली खदानी अंतर्गत येत असलेल्या महालक्ष्मी कंपणीवर धडक देण्यात आली. यावेळी येथे काम करत असलेल्या कामगारांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. सदर कंपण्यांमध्ये रोजगार देतांना स्थानिकांना डावलल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने या कंपण्यांना भेट देत येथील कामाची पाहणी आमदार किशोर जोरगेवार व आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.

अचानक सदर कंपणीमध्ये दोन आमदार पोहचल्याने येथील व्यवस्थापणाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी येथे काम करत असलेला कामगार स्थानिक भुमीपूत्र आहे का या बाबत शहानिशा करण्यात आली. येथे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचेही यावेळी लक्षात आले. त्यांनतर दोन्ही आमदारांनी संताप व्यक्त करत येथील उद्योगांमध्ये स्थानिकांनाच रोजगार देण्यात यावा अशा सक्त सुचना कंपणी व्यवस्थापनाला केल्या आहे. यावेळी संबधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top