Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सन्मित्र महिला सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रजनीताई हजारे यांचे हस्ते
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथील सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेंट उपसरपंच वासुदेव चापले यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्त...

  • स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथील सार्वजनिक वाचनालयाला स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेंट
  • उपसरपंच वासुदेव चापले यांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके स्वीकारली

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पंचायत, मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ही बाब ग्रामस्थांना जाणवू लागली. मंगी (बु) गावाच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे ती प्रशासनासोबत अंबुजा सिमेंट फाउन्डेशन. अंबुजा सिमेंट फाउन्डेशन संकल्पनेतून साकारलेले गावाच्या मध्यभागी असलेले सार्वजनिक वाचनालय. हे फक्त वाचनालय नाही तर स्पर्धा परीक्षेचे तालुक्यातील महत्वपूर्ण केंद्र बनावे यासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके सुध्दा मोठया प्रमाणात उपलब्ध होता आहे. या वाचनालयास सन्मित्र महिला सहकारी बँक, चंद्रपूरचे अध्यक्ष रजनीताई हजारे यांनी 50 स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिलेली आहे. राज्यसेवा व राष्ट्रीयसेवा परीक्षेसह पोलीस भर्ती, तलाठी भर्ती व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकाचा संच भेट मिळालेला आहे.

याप्रसंगी सन्मित्र महिला सहकारी बँक, चंद्रपूरचे अध्यक्ष रजनीताई हजारे यांचे आभार व्यक्त केले. त्यात मंगी (बु) चे सरपंच रसिकाताई पेंदोर, उपसरपंच वासुदेवजी चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास जाधव, माजी जि.प.सदस्य भिमराव पुसाम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश वेडमे, पेसा समितीचे अध्यक्ष संगीताताई कोडापे, ग्रा.पं.सदस्य सोनबत्तीताई मडावी, शंकर तोडासे, शिल्पाताई कोडापे, रुख्माबाई चव्हाण, माधुरीताई चनकापुरे, वसंत मेश्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमनताई येमुलवार, सदस्य लिलाताई सिडाम, सुमनताई रोहणे, ज्येष्ठ नागरिक संभाजी लांडे, ग्रा. पं. सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, क्रांती महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष कविता मडावी तथा गावातील समस्त ग्रामवासीय यांनी आभार व्यक्त केले. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top