Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील सांस्कृतिक विभाग व आय.क्यु...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील सांस्कृतिक विभाग व आय.क्यु.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी कुलगुरू मा. डॉ. विजयराव आईंचवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमात डॉ. आईंचवार यांच्या शुभहस्ते पदवी वितरित करण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. वारकड होते. विशेष अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष सुधाकरराव कुंदोजवार, माजी आमदार तथा संचालक एड. संजय धोटे, कोषाध्यक्ष एड. मुरलीधरराव धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सचिव अविनाश जाधव, संचालक साजिद बियाबाणी, श्री शिवाजी महाविद्यालय चे उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी उपस्थित होते.

कार्यक्रमात महाविद्यालयातील संशोधन केंद्रातून आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच प्रमाणे महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रा. संजय शेंडे यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील एम.ए., एम.कॉम., एम.एससी.,बी.ए., बी.कॉम. व बी.एससी. पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली.

प्रास्ताविक डॉ. खेराणी, संचालन डॉ. संजय लाटेलवार तर आभार प्रा. गुरुदास बलकी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यायचे प्राचार्य वारकड यांच्या मार्गदर्शनात व डॉ. लाटेलवार यांच्या नेतृत्त्वाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top