Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सास्ती कोळसा खाणीत डिझेल चोरांची गाडी सापडली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोळसा खाणीत पुन्हा खुलेआम चोरी अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळ...

  • कोळसा खाणीत पुन्हा खुलेआम चोरी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत दिनांक 17 मार्चला रात्री डिझेल चोरट्यांनी डिझेल भरताना कंपनीचे कामगार खाणीत आल्याने आणि पळून जाताना गाडी सुरू न झाल्याने गाडी सोडून हे चोरटे पळुन गेले. यामुळे चोरलेल्या डिझेल सह झायलो गाडी सापडली. सुरक्षा रक्षकांनी या घटनेची तक्रार 18 मार्चला राजुरा पोलिसात दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून डिझेल सह गाडी जप्त केली आहे. 

दिनांक 17 मार्चला रात्री 9 वाजता सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीच्या आतील बी 2 या कोळसा स्टॉकवर एक झायलो गाडी आली. यावेळी अधिकाऱ्यांची गाडी असावी, म्हणुन काही कामगार या गाडीजवळ आले. मात्र ते येईपर्यंत ही गाडी सुरूच झाली नाही. त्यामुळे चोरटे पळून गेले. चोरांनी उभ्या असलेल्या एका एक्साव्हेटर मशीन मधून आधीच डिझेल कॅन भरून घेतल्या होत्या. यावेळी कामगारांनी तातडीने व्यवस्थापनाला माहिती दिली. सुरक्षा रक्षकांचे फिरते पथक येथे आले. मात्र तोपर्यंत चोर पळून गेले. 

या घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावरून एक झायलो गाडी क्रमांक एमएच 31 / 3678 किंमत रुपये दोन लाख, या गाडीत डिझेल भरलेल्या पाच कॅन, 175 लिटर डिझेल किंमत रुपये चौदा हजार व आठ रिकाम्या कॅन असा एकूण 2 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे अधिक तपास करीत आहेत. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top