- जिल्हाधिकारी यांचा विनामास्क फिरणाऱ्या अधिकाऱ्यांना दम
- कामगारांना मास्क वितरित
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलीस आयुक्त अरविंद साळवे यांना प्रशासकीय भवनासमोरून जातांना सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयासमोर नोंदणीकरिता जमलेले कामगार मास्क न लावता व सामाजिक अंतराचे पालन न करता मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेले दिसले. त्याचवेळी त्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयातून मास्क बोलावून या कामगार मजूरांना वाटप केले व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगून विनामास्क बाहेर न फिरण्याचे आवाहन केले. तसेच कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना कामगारांची नोंदणी करतांना कोरोनाविषयक सुरक्षेची खबरदारी घेण्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने व पोलीस अधीक्षक साळवे यांनी प्रशासकीय इमारतीत फेरफटका मारून अधिकारी व कर्मचारी मास्क लावतात की नाही याची पाहणी केली तसेच या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आलेले आहेत तेथील सुरक्षा यंत्रणेचीदेखील पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसिलदार निलेश गोंड हे देखील त्यांचेसमवेत होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.