Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तनीस वाहून नेणाज्या पिकअप गाडीला आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी येथील घटना अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या तनीस वाहून नेणाज्या पिकअप गाडीला जि...

  • गोवरी येथील घटना
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
पोंभूर्णा येथून गोवरी येथे आलेल्या तनीस वाहून नेणाज्या पिकअप गाडीला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन आग लागून पूर्ण तणीस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.

पोंभूर्णा येथून पिक अप गाडी क्र. एम एच 34 बि जी 0620 गोवरी येथे तनीस घेऊन गोवरी येथील शेतकरी ऋषी लांडे यांच्या शेतात जातांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन पिक अप गाडीलाअचानक आग लागली. आग लागताच परिसरातील शेतकज्यांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला. राजुरा येथून अग्नीशामन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आले परंतू या पांदन रस्त्याने अग्नीशामन दलाची गाडी पोहचू शकत नसल्याने सदर गाडीतील आगीवर नियंत्रण आणण्यास मोठी अडचण निर्माण झाली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणले गेले परंतू गाडीतील तणीस वाचवू शकले नाही तर गाडीचेही जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नसली तरी गाडी चालकांचे हात भाजून तो जखमी झाला आहे. या घटनेत गाडी चे व शेतकज्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जात आहे. 






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top