Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुराच्या जंगल सफारी विरोधात शेतकरी आक्रमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - मध्य चांदा वन विभागा अंतर्गत येत असलेल्या राजुरा वन परिक...

  • गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
मध्य चांदा वन विभागा अंतर्गत येत असलेल्या राजुरा वन परिक्षेत्रात जंगल सफारी सुरू करण्यात येत असून या करिता वन विभागाने 28 पर्यटन स्थळ तयार केले आहे. या माध्यमातून वन विभाग वन पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करीत असला तरी या जंगल सफरीला जंगल व्याप्त परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. जंगल सफारी मुळे वन्य प्राणी जंगला बाहेर येऊन शेत पिकाचे मोठे नुसकान करणार असल्याने या जंगल सफरीला विरोध करण्यासाठी किसान क्रांती समन्वय समितीने वन कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे.

वन विभाग राजुरा वनपरिक्षेत्र तील अंदाजे 10 हजार हेक्टर मध्ये जंगल सफारी सुरू करीत आहे, या वन पर्यटना करिता विभागाने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी 28 पर्यटन स्थळ तयार केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसात जंगल सफारी सुरू होणार आहे. या माध्यमातून वन पर्यटनाला चालना देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे पण या सफारी ला जंगल व्यप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या जंगल सफारी मुडे वन्य प्राण्यांच्या अधिवासावर मोठे प्रशचिन्ह निर्माण होत आहे. पर्यटक व वाहनांच्या गोंगाटा मुळे वन्य प्राणी जंगला बाहेर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, यामुडे शेत पिकाचे नुसकान होणार असल्याने शेतकऱ्यांनी या सफरीला विरोध केला आहे. वन विभागाच्या या घातकी निर्णया विरोधात किसान क्रांती समन्वय समितीने वन कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता जंगल व्याप्त परिसरातील शेतकऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन समितीचे तालुका प्रमुख प्रदीप बोबडे यानी केले आहे. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top