Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पध्दतीने साजरी करा शासनाच्या मार्गदर्शक सूचना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे या वर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजीचा छत्रपत...

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे या वर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत शासनाने परिपत्रक निर्गमित केले असून यासंबंधी पुढील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन फक्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

शिवजयंतीच्या दिवशी रक्तदान इ. विविध आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. 

आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

कोव्हिड-19 च्या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित स्थानिक प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच संदर्भिय परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकात नमूद केले असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top