Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नाफेडमार्फत चना खरेदीसाठी नोंदणी सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात नाफेड मार्फत आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदी करने साठी शेतकरी नों...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
चंद्रपूर जिल्ह्यात नाफेड मार्फत आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदी करने साठी शेतकरी नोंदणी दिंनाक 15 फेब्रुवारी 2021पासुन सुरु करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या तालुक्यात खरेदी केंद्र सुरु नाही, अशा तालुक्यांना खालीलप्रमाणे इतर तालुक्यांशी जोडण्यात आलेले आहे.

चना खरेदी नोंदणीसाठी चंद्रपूर केंद्राला भद्रावती, पोंभुर्णा, सावली व मुल तालुके जोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खरेदी केंद्र वरोराला वरोरा व भद्रावती, खरेदी केंद्र  चिमुरला ब्रम्हपुरी, सिंदेवाही व नागभिड खरेदी केंद्र गडचांदुरला कोरपणा व जिवती तसेच खरेदी केंद्र राजुराला गोंडपिपरी व बल्लारपुर तालुके जोडण्यात आले आहेत.

तरी दिलेल्या खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड, मतदान कार्ड, शेतीचा 7/12, बॅक खाते पासबुक इ. संपुर्ण माहीतीसह खरेदी केंद्रावर जावुन नोंदणी करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top