Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीचे आदेश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - बल्लारपूर तालुक्यातील सर्व टास्क फोर्स सदस्यांची वाढत्या कोरोना संसर्गाच्या संदर्भात उपविभागी...

रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
बल्लारपूर तालुक्यातील सर्व टास्क फोर्स सदस्यांची वाढत्या कोरोना संसर्गाच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यासभेत आजपासूनच बिना मास फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना नगरपरिषद क्षेत्रात नगरपरिषद यांनी आणि ग्रामपंचायत क्षेत्रात संवर्ग विकास अधिकारी यांनी करण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्व मंगल कार्यालये, लॉन, पार्टी हॉल यामध्ये व्यक्तिगत समारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक समारंभामध्ये एक टीम पाठवून अचानक भेटी देऊन 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास दंडनीय कारवाई करण्याचे निर्देश सभेमध्ये देण्यात आले. या कालावधीत कोरोना चाचण्या वाढवून ट्रेसिंग करण्याच्या सूचना सभेत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आल्या. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top