Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सास्ती - मानोली शिवारात वाघाची चाहूल शेतकरी चिंतेत अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील सास्ती-मानोली शिव...

  • सास्ती - मानोली शिवारात वाघाची चाहूल
  • शेतकरी चिंतेत
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील सास्ती-मानोली शिवारातील ओढ्या जवळ एका गायी वर हल्ला करुन तिला जागीच ठार केल्याची घटना घडली. आज दुपारी ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसापूर्वी वाघाने गायीवर हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर गाय विनोद चौधरी यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी-सास्ती कोळसा खाण परिसरा जवळ असलेल्या सास्ती-मानोली शेत परिसरात वाघाचे अस्तित्व आहे. या भागात झुडपी जंगल आणि ओढा असल्याने काही वन्य प्राणी या भागात आहेत. याघटनेमुळे मात्र वेकोलिच्या गोवरी वसाहत परिसरात व कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, नागरिकांनीही सतर्कता बाळगवावी असे आवाहन वनविभागाने केले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top