- वन पर्यटनाच्या शेतकऱ्यांनी केला विरोध
राजुरा -
वन विभागने राजुरा-जोगापुर वन पर्यटन म्हणून जाहिर केले त्या विरोधात किसान क्रांति समन्वय समिति जिल्हा चंद्रपुर च्या वतीने, उपविभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जोगापुर येथे हनुमानाचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. सदर देवस्थान जिल्ह्यातील हजारों नागरिकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी या ठिकाणी सात दिवसाची यात्रा भरत असते. जिल्ह्यातील अनेक लहान - मोठे व्यावसायिक या ठिकाणी दुकाने लावून रोजीरोटी कमवित होते. मात्र आता वनविभागाने या वनाला वन पर्यटन म्हणून घोषित केले आहे. त्याच्या विरोध वन सभोवतालच्या शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे.
वन पर्यटन केल्यामुळे जंगलातील प्राणी गावात येवून नागरिकचे नुकसान करतील, तसेच वन संपत्ती ची मोठ्या प्रमाणात चोरया होतील आणि आणि राखून ठेवलेले जंगल नष्ट होईल. याकरिता वनपर्यटन ला काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून वन पर्यटन बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे,
- वाघच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50 लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी.
- वन्य प्राणी या पासून नुकसान झाल्यास सरसकट एक लाख रुपये प्रति शेतकरी मदत देण्यात यावी.
- सन 2019, 2020, 2021 या काळात शेती नुक्सानीचे पंचनामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
- वन्य प्राण्यांचा बन्दोबस्त करण्यात यावा.
- जंगलातील चोरी गेलेल्या रेतीचा पंचनामा करुन अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी.
अशा अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बाबूराव मडावी, प्रदीप बोबडे, विट्ठलराव बदखल, अरविंद वांढरे, महादेव चाफले, प्रकाश ताजने, सतीश साळवे, बालाजी भोंगळे, अर्जुन अलगमवार, रोशन येवले सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.