Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोवनी गावाजवळ दोन पुलाच्या मधात स्कूटी अडकली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुदैवाने युवक बचावला पूल ठरतोय धोकादायक अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा कडून काही कामानिमित्त साखरी कडे स्कुटीने...

  • सुदैवाने युवक बचावला
  • पूल ठरतोय धोकादायक
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा कडून काही कामानिमित्त साखरी कडे स्कुटीने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने कट मारल्याने राजुरा येथील अमोल खोके (२७) हा युवक स्कुटीसह दोन पुलाच्या मधात अडकला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी युवक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायं. ५.३० वाजताच्या सुमारास घडला.

राजुरा येथील अमोल खोके हा युवक काही कामानिमित्त साखरी गावाकडे जात असताना पोवनी गावाजवळ असलेल्या पुलावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कट मारल्याने दोन पुलाच्या मधात युवक स्कूटीसह खाली कोसळून दोन पुलाच्या मधात अडकला. युवक पुलाच्या मधात अडकल्याची माहिती होताच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी अमोल खोके या युवकाला पुलामधून बाहेर काढले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अमोल किरकोळ जखमी झाला. या पुलावर दोन दिवसात तीन अपघात झाले असून या दोनही पुलाच्या मधात दोन फुटाचे अंतर असल्याने हे दोनही पुल धोकादायक ठरत आहे. दोन दिवसापूर्वीच पोवनी गावाच्या जवळील अशाच प्रकारच्या पुलावर कोळशाची वाहतूक करणारा ट्रक दोन पुलाच्या मधात फसला होता.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top