कोरपना -
जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे दया. या संदर्भात संत रामराव महाराज मठ येथून संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून, सुदाम राठोड यांच्या नेतृत्वाखाली रामराव महाराज मठ ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य पायदळ मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विषयी प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यात तीन पिढ्याची अट रद्द करून अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे दया. बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती करून नौकर भरती चालु करा. गाव तिथे वाचनालय व गाव तिथे स्मशान भूमीची निर्मिती करा, जिवती येथे कोर्ट इमारतीचे बांधकाम करा, लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करा, तालुक्यातील कच्चे रस्ते पक्के करा, अशा तालुक्यातील विविध समस्या विषयी यावेळी भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या मोर्चाचे आयोजन विदर्भ युवा आघाडी समिती जिवती व आम आदमी पार्टी जिवती, शेतकरी संघटना जिवती, गोर सेना जिवती, यांनी संयुक्तपणे मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार शेतकरी संघटना अॅड वामनराव चटप, देविदास वारे, इस्माईल शेख, रमेश पुरी, गणेश कदम तर आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, मिलिंद गडमवार राजुरा विधानसभा प्रमुख प्रदीप बोबडे, आप तालुका अध्यक्ष मारोती पुरी, ता.सचिव गोविंद गोरे, उपाध्यक्ष सुनील राठोड, उद्धव मरके, विकास चव्हाण, विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष सुदाम राठोड, अरविंद चव्हाण, विशाल राठोड, विनायक चव्हाण, अरविंद पवार, विकास राठोड, विनोद पवार, पंडित राठोड तर गोर सेनेचे प्रकाश पवार, उत्तम पवार तसेच या मोर्चात तालुक्यातील असंख्य शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.