- कोरपना तालुक्यातील नोकरी व कढोली ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा
कोरपना -
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या त्यात नोकरी व कढोली ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टी झेंडा फडकला. कढोली ग्रामपंचायत सरपंच म्हणून निर्मला कवडूजी मरस्कोल्हे यांची निवड करण्यात आली तर नोकरी ग्रामपंचायत सरपंच पदी संगीता झित्रू मडावी यांची नियुक्ती करण्यात आली. या दोन्हीही सरपंचांना शुभेच्छा देताना. राजुरा विधानसभा क्षेत्राचे युवा नेते तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी चे राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन जुमनाके यांनी ग्रामपंचायत सरपंचांनी जनसेवेचा व्रत घेऊन कार्य करावे. गावातील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरपंचांनी तत्परतेणे काम करावे असे प्रतिपादन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, माजी परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंग जाधव, बाजार समिती संचालक तथा जेष्ठ नेते ममताजी जाधव, बाजार समिती संचालक निशिकांतजी सोनकांबळे, जिल्हाउपाध्यक्ष जमीर भाई, कोरपना तालुक्यातील युवा नेते संजयजी सोयाम, मूलनिवासी एकता संघर्ष समिती जिवती चे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मेजर बंडूजी कुमरे, गजानन कुमरे माजी सरपंच कढोली, हनुमंत कुमरे माजी सरपंच येसापूर, लक्ष्मण कुळसंगे, बाबाराव सिडाम, प्रकाश शेडमाके उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.