- सरपंच पदी अनुताई ताजने व उपसरपंच पदी बाळा पावडे यांची निवड
- आशिष ताजने यांच्या विकासकामांवर जनतेचे शिक्कामोर्तब
- भाजपातर्फे नारंडा येथे भव्य विजयी मिरवणूक
नारंडा ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य असून हि निवडणूक जिल्ह्याचे लोकनेते, विकासपुरुष माजी वित्त नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली.
यामध्ये भाजपाला ९ पैकी ७ जागा जिंकण्यात यश प्राप्त झाले.व शेतकरी संघटना १ कांग्रेसला १ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधी असणारे दोन्ही पक्षांनी एकत्रित होऊन युती करून निवडणूक लढवली परंतु जनतेने युतीला नाकारत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने स्पष्ट जनादेश देत कौल दिला.
भारतीय जनता पार्टीतर्फे अनुताई ताजने, बाळा पावडे,अनिल शेंडे,रुपाली उरकुडे, रंजना शेंडे,शालू हेपट,बापूराव सिडाम हे ७ उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात आशिष ताजने यांनी नारंडा गावात अनेक विकासकामे खेचून आणत गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला व गावातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहिले. त्याचीच पावती म्हणून जनतेने भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता प्राप्त करून दिली.
या निवडणुकीत सुरेश पाटील परसुटकर, नागोबा पाटील उरकुडे, महादेव खाडे, अनिल मालेकर, अजय तिखट, सत्यवान चामाटे, प्रवीण हेपट, अरविंद खाडे, मंगल वांढरे, रामा शेंडे, अनिल वाडगुरे, सुरेश शेंडे, रवींद्र कांबळे, अरुण सोनपितरे, भगवान आत्राम, बाल्याभाऊ बोढे, नामदेव घुगुल, अनिल निरे, गजानन चतुरकर, अरुण निरे, मारोती बोबडे, सुभाष डवरे, संतोष पावडे, संजय चहानकर, प्रदीप उरकुडे, अरविंद पावडे, महेश बिल्लोरिया, सचिन दवंडे, संतोष वांढरे, बाळा गाडगे, मंगल खाडे, संतोष ताजने, बाल्या नागोसे, अजय काकडे, विनोद काथवटे, अमोल ताजने, प्रमोद शेंडे, गणेश पावडे, अजय शेंडे, भिकाजी घुगुल, वैभव गंगमवार, आशिष निवलकर, संदीप चौधरी, देवा पेटकर, मनोज तिखट, शंकर चाहारे यांनी अथक परिश्रम केले.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.