- हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदार व ठाणेदारांना निवेदन
इतकेच नव्हे तर या दिवशी संततिप्रतिबंधक साधनांचा विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ ही अनैतिक संबंधातील वृद्धी दर्शवते, तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात. मुलींना खोटी नावे सांगून फसवून त्यांना लव्ह जिहाद चा बळी बनवतात. थोडक्यात व्हॅलेंटाईन डे मुळे शाळा महाविद्यालय परिसरातील कायदा-सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे, याचा अतिरिक्त ताण पोलिस आणि प्रशासनावर येत आहे सध्या स्थितीत भारतात प्रति १८ मिनिटाला एक बलात्कार होत आहे, महिलांवरील अत्याचाराची भयावह आकडेवारी सध्याची समाजाची ढासळलेली मानसिकता आणि कायदा-सुव्यवस्थेची दुःस्थिती दर्शवते.
त्यामुळे अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व्हॅलेंटाइनडे च्या नावाखाली होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावी, शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अपप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना कह्यात घ्यावेत, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवावी, मुलींची छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी, वेगाने आणि मद्यपान करून वाहने चालवनाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच शाळा महाविद्यालयात माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागावी यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून १४ फेब्रुवारीला मातृ-पितृ दिन म्हणून शासनाने प्रोत्साहन द्यावे आणि युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करावा, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ११ फेब्रुवारीला तहसीलदार हरीश गाडे तसेच ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांना देण्यात आले ह्यावेळी हिंदु जनजागृती समितीचे नामदेव उरकुडे व सुरेश बोबडे तसेच बजरंग दल राजुराचे आकाश आक्केवार व साहिल बोरसरे उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.