सोमवार रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व युवराज कुडे यांच्या नेतृत्वात वीस वर्षे भाजपचा सरपंच असलेल्या देवाडा गटग्रामपंचायत मध्ये मनसेच्या उमा राजू लोनगाडगे निवडून आल्या तर गणपत कुडे यांच्या मार्गर्शनात उपसरपंच पदी काँग्रेसचे विशाल रामटेके निवडून आले आहे.
तसेच थोराना कुचना गटग्रामपंचायतीवर मनसेचे मनोज तिखट हे निवडून आले आहे. तर नागाळा (सी) गट ग्रामपंचायतीत प्रकाश शेंडे, विवेक धोटे, नितीन टेकाम, माया धोटे व पडोली ग्रामपंचायतीत निशिकांत पिसे व सुनीता पिंपळकर हे निवडून आले आहेत.
या सर्व निवडणुकांचे श्रेय हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आहे, व येणाऱ्या काळात मनसे जोमाने लोकहिताचे व अभिनव कामे हातात घेनार अशी माहिती यावेळी राहुल बालमवार यांनी दिली.निवडणूक जिकण्यासाठी प्रकाश नागरकर, कुलदिप चंदनखेडे,करण नायर,मयुर मदनकर यांनी मेहनत घेतली तर मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीताताई गायकवाड जिल्हा सचिव,किशोर मडगुलवार,मनोज तांबेकर, कृष्णा गुप्ता, प्रविन शेवते शैलेश सदालावार फिरोज शेख जिवन गेडाम व महाराष्ट्र सैनिक यांनी गावातून रॅली काढत मतदारांचे आभार मानून विजयी उमेवारांचा सत्कार केला.





टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.