- वृत्तपत्र/डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या सन्मानचिन्ह देऊन सन्मान
- गणेश जयंती निमित्य चिल्लावार हॉस्पिटल चा उपक्रम
राजुरा -
दरवर्षी माघ महिन्यात गणेश जयंती निमित्य स्थानिक चिल्लावार कुटुंबीय भारत चौक येथील श्री गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रमासोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम करीत असतात. यादिवशी हजारों भाविक दर्शनासोबतच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. परंतु यावर्षी पारंपरिक अनुष्ठानाला बगल देत "शुभमं करोति कल्याण आरोग्य धन संपदा" सर्वांचे आरोग्य सुदृढ राहो या अनुषंगाने चिल्लावार हॉस्पिटल द्वारे गणेश जयंती निमित्य दि. १५ फेब्रुवारीला निःशुल्क रोग निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, न्यूरोपॅथी, बोन डेन्सिटी, पल्मोनरी फंक्शन (PFT), थॉयराईड यासारख्या दुर्धर आजारावर सुप्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ् डॉ. स्वप्नील चिल्लावार यांनी चारशेहून अधिक लोकांना उपचार देत रोग निदान व मार्गदर्शन केले. उपस्थितांकरिता चहा-पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
याव्यतिरिक्त राजुरा तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वृत्तपत्र पत्रकारासोबतच डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या नगराध्यक्ष अरुण धोटे, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, प्रतिष्ठित व्यापारी विनायकरावजी चिल्लावार, डॉ. स्वप्नील चिल्लावार, व्यापारी समीर चिल्लावार यांचे हस्ते स्व. हनमंतु विश्वनाथ चिल्लावार स्मृती प्रित्यर्थ शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणी उद्घोषिका मंजुषा भास्करवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वितेकरिता प्रतिष्ठित व्यापारी विनायकरावजी चिल्लावार, समीर चिल्लावार व संपूर्ण चिल्लावार कुटुंबीयांनी परिश्रम घेतले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.