- आतापर्यंत 17,121 बाधित झाले बरे
- उपचार घेत असलेले बाधित 1,795
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 226 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे तर 211 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 203 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 121 झाली आहे. सध्या एक हजार 795 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 44 हजार 922 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 21 हजार 610 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 287 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 267, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.