Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ७ सप्टेंबरला श्री माता महाकाली मंदिर राहणार बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
७ सप्टेंबरला  श्री माता  महाकाली मंदिर राहणार बंद अनिलभाऊ महाकाळे यांनी भाविकांना दिली माहिती आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ०४ सप्ट...
७ सप्टेंबरला 
श्री माता महाकाली मंदिर राहणार बंद
अनिलभाऊ महाकाळे यांनी भाविकांना दिली माहिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२५) -
        रविवार दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत असल्याने शहरातील महाकाली मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रहणाची वेळ दुपारी १२.३७ वाजता सुरू होणार असून त्यामुळे मंदिर दुपारी १२.३० पासून बंद करण्यात येईल. त्यानंतर सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद राहतील.

        यासंदर्भात चंद्रपूर महाकाली मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिलभाऊ महाकाळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ग्रहणकाळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवले जाणार आहे. तरी सर्व भक्तांनी याची नोंद घ्यावी”. ग्रहण संपल्यानंतर नेहमीप्रमाणे मंदिरात पुन्हा दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

#ChandrapurNews #MahaKaliMandir #TempleClosed #LunarEclipse2025 #ChandrapurUpdates #DevoteeAlert #TempleNotice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top