Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन बाधितांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्ह्यात 24 तासात 166 बाधित बाधितांची एकूण संख्या 11472 उपचार सुरु असणारे बाधित 3194 चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8099 बाधितांना डिस्चार्ज...

  • जिल्ह्यात 24 तासात 166 बाधित
  • बाधितांची एकूण संख्या 11472
  • उपचार सुरु असणारे बाधित 3194
  • चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8099 बाधितांना डिस्चार्ज
  • चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट्स
  • वाचा सविस्तर....
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 166 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी 8 हजार 99 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, छोटा नागपूर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दोनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच,  नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ ,भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच,  सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक असे एकूण 166 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापुर, घुटकाळा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, हॉस्पिटल वार्ड, प्रगती नगर, विद्यानगर, तुकूम, गिरणार चौक परिसर, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, जल नगर वार्ड, बाबूपेठ, सरकार नगर, पठाणपुरा वार्ड, घुग्घुस, द्वारका नगरी, ओमकार नगर, हनुमान नगर,भाना पेठ वार्ड, घंटाचौकी, बोर्डा, बापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्ड, विद्या नगर वार्ड, गौरक्षण वार्ड, साईबाबा वार्ड, बामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्ड, बामणवाडा, सोमनाथपूर वार्ड, मानोली, कढोली, म्हाडा कॉलनी परिसर, जवाहर नगर, सास्ती,धोपटाळा भागातून बाधीत पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्ड, आंबेडकर वार्ड, सलीम नगर, टेमुर्डा, गांधी वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली, चौगान, मालडोंगरी, विद्यानगर, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील विस्लोन, जुना सुमठाणा, झिंगोजी वार्ड, सुरक्षा नगर, एकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगाव,व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही,भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील डोंगरगाव, पेंढरी, मोहाडी, वसुंधरा कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेंगाव, नेताजी वार्ड, टिचर कॉलनी परिसर, राजीव गांधी नगर, नेहरू वार्ड, गुरुदेव नगर  भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एक, हेकाडी, राजोली, ताडाळा परिसरातून बाधित ठरले आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top