Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, जिवती, कोरपना हे तालुके चना (हरभरा) एन.एफ.एस.एम. मार्फत रब्बी 2020 - 2021 समाविष्ट करण्यात यावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार एड. संजय धोटे यांची मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यातील ...

  • माजी आमदार एड. संजय धोटे यांची मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, जिवती, कोरपना हे तालुके चना (हरभरा) एन.एफ.एस.एम. मार्फत रब्बी 2020-2021 मधून वगळण्यात आले असून रब्बी हंगामात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार एड. संजय धोटे यांनी मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली, सध्या शेतकरी आर्थिक हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे रोख पिक कापूस, सोयाबीन, यासाठी यावर्षी रब्बी हंगामात सबसिडी वर मिळणारे एन.एफ.एस.एम.रब्बी 2020 - 2021 मधून चना (हरभरा) हे बियाणे या योजने मधून राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके वगळण्यात आले आहे.

या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी होते. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा रब्बी 2020 मध्ये या तिनही वगळलेल्या तालुक्यांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार एड. धोटे यांनी केली आहे. याबाबत शेतकरी हिताचा त्वरित योग्य विचार करून सहकार्य करावे व शेतकरी बांधवांना न्याय द्यावे, तसेच माजी अर्थमंत्री आमदार मा.सुधीर मुनगंटीवार यांना सुध्दा याविषयी संदर्भात निवेदन देवून मागणी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top