- कृषी विधेयक राज्यात लागू करण्याची केली मागणी
- तहसीलदारांमार्फत पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र
राजुरा -
भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने आज पंचायत समिती राजुरा चौका मधून विविध माग्णांसाठी महाराष्ट्र राज्यातील तिघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करत ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रात ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून केंद्र सरकारच्या व मागील भाजपा शासनाच्या काळातील निर्णय व विविध योजनांना स्थगिती देण्याचे काम सातत्याने सुरु आहे.
मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दोन्ही सभागृहात कृषी विधेयक २०२० बहुमताने पारित केले. सदर विधेयक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या विधेयकाने शेतकऱ्यांची दलालांपासून मुक्तता होणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा लाभ मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार. परंतु शेतकऱ्यांप्रति बेगडी प्रेम असेलेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदर विधेयक महाराष्ट्र राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी व्हावी या करिता आज भाजपा राजुरा वतीने आंदोलन करण्यात आले. सोबतच तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ही पाठविण्यात आले.
या आंदोलना प्रसंगी भाजपा जिप सभापती सुनील उरकुडे, भाजपा नेते सतीस धोटे, तालुका महामंत्री दिलीप वांधरे, तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपा नेते हरी झाडे, भाजपा नेते सुरेश रागीट, उपसरपंच बाळणाठ वडस्कर, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार भोगा यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपसथित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.