Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाविकास आघाडी सरकार विरोधात सिंदेवाहीत भाजपचे निषेध आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी विधेयक राज्यात लागू करा या मागणीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी सिंदेवाही - सदैव शेतकर्‍यांच्...

  • कृषी विधेयक राज्यात लागू करा या मागणीचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
सिंदेवाही -

सदैव शेतकर्‍यांच्या, सामान्यांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या सुख कल्याणासाठी मागील महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक-२०२० बहुमताने पारित केले. हा कृषिकायदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून यामुळे शेतकऱ्यांची दलालांकडून होणारी पिळवणूक थांबणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकटी सुद्धा मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांसाठी एक देश, एक बाजारपेठ अशी संकल्पना उदयास येणार आहे. परंतु शेतकऱ्यांप्रती नेहमी तोकडी भुमिका घेणार्‍या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदरहू विधेयक महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेतल्याने हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी करण्यात यावी. याकरिता आज भारतीय जनता पार्टी सिंदेवाही तालुका यांचे वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यासोबतच मा.तहसीलदार साहेब यांना तालुका भाजपच्या शिष्टमंडळातर्फे यावेळी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी, जि.प.समाज कल्याण सभापती तथा तालुका महामंत्री नागराज गेडाम, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, जेष्ठ नेते प्रा.गणविर सर, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, गटनेते तथा पंस सदस्य रितेश अलमस्त, माजी नगराध्यक्षा सौ. मोहीनीताई गेडाम, माजी उपनगराध्यक्ष हितेश सुचक, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, राजु करकाडे, रोशन मुद्दमवार, नगरसेविका सौ.अंजली बल्लेवार, सौ.शालीनी बोरकर, सौ.छाया हाडगे व ईतर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top