Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघा द्वारे विविध मागण्याचे निवेदन सादर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश शाखा चे विद्यमाने महाराष्ट्...

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश शाखा चे विद्यमाने महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, एस.बी.सी. सह ओबीसी प्रवर्गासाठी गठित केलेले महाज्योति या निधीचा अभाव आहे. याकरिता विनियोग, विकास कसा होणार याकरीता आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष यांचे नेतृत्वात शिष्टंडळाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे, मदत, पुनर्वसन तथा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र सादर करण्यात आले. निवेदनातून महाज्योति मध्ये विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील अशासकीय सदस्य नेमावें, विमुक्त भटक्या जमाती सह ओबीसी ची जनगणना केली पाहिजे. विमुक्त जाती भटक्या जमाती समाजा सह ओबीसी वसतिगृह अनुदानात वाढ करावे, विमुक्त भटक्या समाजासाठी नॉन क्रिमी लेअर ची अट रद्द करावी या संदर्भात उत्पन्न मर्यादा 15 लाख करावे. महाज्योति मार्फत समस्त विमुक्त भटक्या जमाती सह ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यथा शीघ्र सुरू करावे. अशा विविध मागण्यांसह निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी शिष्ट मंडळात चंद्रशेखर कोटेवार, अशोक जाधव, रतन शिलावार, अमित साळवे उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top