राजुरा -
राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली (बु.) येथे आज सकाळी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या उपसरपंच मारोती नेव्हारे व दादाजी घोडमारे यांच्यावर जंगली डुक्कराने हल्ला केला. यात हे दोघेही जखमी झाले असून दोघांवरही वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात वाघाची दहशत पसरली असून सोमवारी खांबाळा बिटात वाघाने मारोती पेंदाम या शेतकऱ्याचा बळी घेत परिसरातील दहावा मानव बळी घेतला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक प्राण्यांचा फडशा पाडला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यातच आता जंगली डुक्कराच्या हल्ल्यातून मानव-प्राण्यांना संरक्षण देण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या नरभक्षक वाघा बरोबरच आता जंगली डुक्कराचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.