Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: केन्द्र सरकारने संमत केलेल्या कृषी विषयक कायदयाच्या अंमलबजावणी ला स्थगीती देण्याचा सहकार व पणण मंत्री यांचा आदेश रदद करण्या बाबत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय जनता पार्टी जिल्हा नागपूर यांची मागणी सदर आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - केन्द्र ...

  • भारतीय जनता पार्टी जिल्हा नागपूर यांची मागणी
  • सदर आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
केन्द्र सरकारने नुकतेच शेतकरी हिताचे तिन कृषी विधेयके मंजुर करुन नवीन कृषी विषयक कायदा लागु केला.या नवीन कृषी कायदयानुसार देशातील सर्व शेतकरी दलालांच्या जोखंडातुन मुक्त होवुन त्याला स्वकष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले असुन एक देश एक बाजारपेठ ही नवीन संकल्पना साकार झाली आहे.नवीन कृषी कायदयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे सर्व राज्यांना निर्देशही देण्यात आले.त्यानुसार राज्य सरकारने  दिनांक 10 ऑगष्ट 2020 रोजी  परीपत्रक काढुन सर्व जिल्हा उपनिंबंधक व सर्व बाजार समीत्यांनी केन्द्र सरकारच्या शेतक-यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुवीधा)अध्यादेश -2020 नुसार तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेशीत केले. परंतु नंतर केवळ विरोधासाठी विरोध म्हणुन स्वपक्षाच्याच वाशी येथील कृषी बाजार समीती सभापती  शशीकांत शिंदे यांना जाणीव पुर्वक अपील करायला सांगुन त्वरेने सुणावणी घेण्यात येवुन वरील नुसार स्थगीती देण्याचा एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.

तसेच दिनांक 30 सप्टेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीतही केन्द्र सरकारच्या कृषी कायदयाच्या अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या व केन्द्र सरकारच्या कृषी कायदयाला राज्यात स्थगीती देण्याच्या इरादयाने मंत्रीमंडळ उपसमीती नेमण्याचा व विवीध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केवळ कृषी उत्पन्न बाजार समीती सभापतीच्या अपीलावर एकतर्फी निर्णय घेणे,दिनांक 24 जुन व 10 ऑगष्ट रेाजी केन्द्रीय कृषी कायदयाच्या स्वत:च काढलेल्या अंमलबजावणी आदेशाला स्थगीती देणे.मंत्रीमंडळ बैठकीतही जाणीव पुर्वक शेतकरी विरोधी निर्णय घेणे या सर्व घडामोडीवरुन राज्यातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी असुन राज्य सरकारच्या निर्णयाचा नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने त्रिव्र शब्दात निषेध  केला.

सबब, केन्द्र सरकारने संमत केलेल्या कृषी विषयक कायदयाच्या अंमलबजावणी ला स्थगीती देण्याचा सहकार मंत्री यांच्या आदेशाला त्वरीत रदद करुन मंत्रीमंडळातील ठरावही रदद करण्यात यावा व शेतकरी हितासाठी राज्यात त्वरीत नवीन कृषी कायदयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची आहे. सदर आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा प्रदेश महामंत्री,अरविंद गजभिये ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांचा नेतृत्वात करण्यात आली यावेळी उपस्थित खासदार डॉ.विकास महात्मे,आमदार गिरीश व्यास,आनंदराव राऊत, रमेश मानकर,किशोर रेवतकर,अविनाश खळतकर, ईमेश्वर यावलकर, अजय बोढारे,अनिल निधान,संदीप सरोदे,संध्याताई गोतमारे,विशाल भोसले,अंबादास उके,आदर्श पटले,दीपचंद शेंडे, कपिल आदमने,प्रमोद हत्ती इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top