- केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
चिमूर -
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहीताचे अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी करण्याचे कामही केले. मोदी सरकारने संसदेतील दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांति घडविणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकऱ्यांबद्धल बेगडी प्रेम असणारी काँग्रेस आणी विरोधक अकारण कांगावा व अपप्रचार करून राजकारण करीत आहेत.
या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बांधव बंधमुक्त आणी दलालांच्या जोखंडातून मुक्त होऊन आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची विक्री व बाजार पेठेत स्वतंत्र मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतमाल कुठेही आणी योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मा. मोदींनी एफ.एम.एस.सी. कुठल्याही प्रकारे बंद होत नसल्यामुळे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार असून नेहमीच शेतकऱ्यांबद्धल पुतण्या, मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना दिलेला मताचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारनी दिलेले शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावणारा स्थगिती आदेश काढला आहे. हा स्थगिती आदेश तातडीने रद्द करून केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने भारतीय जनता पार्टी चिमूर यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार मा. किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी चिमूर यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे, डॉ.देवनाथजी गंधारे, भाजपा नेते राजूभाऊ देवतळे, प्रवीण गणोरकर, पंचायत समिती सदस्य पुंडलिक मत्ते, प्रदीप कामडी, बकाराम मालोदे, नगरसेवक संजय खाटीक, विजय झाडे, राजू बोडणे, विवेक कापसे, समीर राचलवार, मनीष तुंपल्लीवार, किशोर मुंगले, रमेश कंचरलावार, प्रशांत चिडे, सचिन फारकाडे, योगेश नाकाडे, अरुण लोहकरे, शैलेंद्र पाटील, कलीम शेख, मायाताई नंनावरे, कल्यानी सातपुते, विकी कोरेकर, विनोद खेडकर, भारती गोडे, छाया कंचलावार, बाबाजी ननावरे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.